Success Story
Success Story

आमची यशोगाथा

वडिलांचं छत्र हरवलं आणि नियतीनेही डोक्यावरचं घराचं छप्पर काढून घेतलं. तिथून पुढं सात वर्ष एक आई आपल्या दोन चिमुकल्या मुलांना घेऊन सांगली शहरातील कृष्णा नदीच्या काठावर एका पिंपळाच्या पारावर आपला संसार थाटून मोलमजुरीची कामे करत आपल्या पिलांना वाढवत होती. पायाखाली रोज ठेच लागणारी जमीन आणि डोक्यावर होतं अमर्याद आकाश!
अशा परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला हरिभाऊ कुलकर्णी नावाचा माणूस परिस्थितीच्या टक्क्याटोणप्यानी जे शिकवलं ते सकारात्मक वृत्तीनं घेत शिकला... पण अमर्याद निरभ्र आकाशाने त्याला एकच ब्रीद वाक्य शिकवलं 'स्काय इज द लिमिट'. अगदी लहान वयात रामगाड्यासारखा राबणाऱ्या हरिभाऊंनी कष्टालाच आपला देव मानलं.


पुढे सांगलीच्या कोर्टासमोर चहाचं कॅन्टीन चालवता चालवता... त्यांनी अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. 'हरी का खाना खजाना' नावाचं फिरतं हॉटेल, तीन हजार मुलांच्या डे-बोर्डिंगची मेस,भारती मेडिकल कॉलेजची मेस आणि कॅन्टीन, 'हनुमान' नावाचं शेकडो प्रकारच्या डोश्याचं अनोखं सेंटर, 'सीप & स्नॅक्स' नावाचं अफलातून पदार्थांची रेलचेल असलेले हटके हॉटेल... आणि त्यानंतर सुरु झाला फक्कड चहाचा उत्साह आणि अवीट गोडी देणारा एक फर्मास ब्रँड.
'चहा म्हणजे आपल्या सर्वांचा आत्मा!' चहाची तल्लफ म्हणजे मैत्रीचं नातं, चर्चेचा मुद्दा आणि आनंदाचे क्षण आणखी उत्कट करणारी भावना. जिथं दोन-चार लोक भेटतात, तिथं सगळ्यात पहिल्यांदा तल्लफ येते ती चहाची. म्हणूनच चहा ही आपली भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक गरज आहे. हीच गरज अधिक चांगल्या पद्धतीने, रम्यपणे, आल्हाददायक आणि उत्साही व्हावी म्हणून आम्ही 'हरमन चहावाला' या फक्कड चहाची कॉर्पोरेट आऊटलेट गेल्या वर्षी सुरु केली.

अवघ्या काही दिवसात अशा प्रकारच्या सुंदर अंतर्गत सजावट असलेल्या, विनम्रपणे कडक आणि अवीट गोडीच्या चहाचा कप आपल्यासमोर धरणाऱ्या 'हरमन चहावाल्याच्या' आऊटलेट्सना महाराष्ट्रातून मागणी येऊ लागली. महाराष्ट्रात आता 'हरमन चहावाला' ब्रँडची १०० पेक्षा अधिक आऊटलेट्स सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर 'हरमन चहा'ची जिभेवर रेंगाळणारी फक्कड चव ग्राहकांच्या पावलांना पुन्हा पुन्हा 'हरमन चहा' पिण्यासाठी 'हरमन चहावाला'च्या आऊटलेट्सवर घेऊन येऊ लागली आहे. नव्या युगाच्या आधुनिक मागणीप्रमाणे अतिशय मॉडर्नाईज्ड आऊटलेटमुळे 'हरमन चहावाला' ही कन्सेप्ट शॉपी ग्राहकांच्या मनात आपुलकीचं स्थान मिळवत आहे. आऊटलेटच्या स्वच्छ, सुंदर रुपाबरोबरच प्रशिक्षित व स्वच्छ ड्रेसकोड असलेले कर्मचारी, आमच्या स्पेशल चहा मसाला फॉर्मुल्यानं आणलेली अविस्मरणीय चव, आटीव दुधात चहा बनविण्याची खास शैली यामुळे 'हरमन चहावाला' अल्पावधीतच ISO 9001-22005 & DAC (Dubai Accreditation) प्रशस्तिपत्राने सन्मानित झाला आहे. एक वेगळ्या प्रतिष्ठेचा, भरभराट देणारा ब्रँडेड व्यवसाय म्हणून 'हरमन चहावाला'नं आपलं वेगळं स्थान ग्राहकांच्या मनात निर्माण केलं आहे. गुंतवणुकदारांना उत्तम व्यवसायाची संधी देत अनेकांना रोजगाराची संधीही 'हरमन चहावाला'च्या माध्यमातून झाली आहे.

गुणवत्ता व सुरक्षितता धोरण

आम्ही अतिशय उच्च प्रतीचा चहा स्वच्छता आणि सुरक्षितता याचे सर्व नियम पाळून ग्राहकांना देत आलो आहोत. तसेच आमच्या कार्यपद्धतीत सतत सुधारणा करण्यास आम्ही सदैव उत्सुक असतो. सध्याच्या कोव्हिड-१९ परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात आमचे सर्व कर्मचारी मास्क घालून, हातात ग्लोज घालून, सातत्याने सॅनिटायझरचा वापर करत आणि सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांसह सुरक्षितता पाळत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने युज अँण्ड थ्रो कपचा वापरही आपण सुरू केला आहे. हरमन चहाच्या सर्व शाखाही नियमित सॅनिटाईज केल्या जात आहेत.


व्यावसायिकांसाठी भविष्यातील सुवर्णसंधी

आत्मनिर्भर भारत, वोकल अबाऊट लोकल या संकल्पनेची कास धरत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वांसाठी, मर्यादित गुंतवणुकीचा हरमन चहाची शाखा सुरू करण्याचा फ्रँचायझी पर्याय आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला व्यवसायासाठी प्रोत्साहन, एक नवी स्फूर्ती, नवे पाठबळ उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत अतिशय माफक दरात आपणासाठी व्यवसायाची नवी संधी फ्रँचायझीच्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. या पर्यायाच्या माध्यमातून आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकाल आणि या व्यवसायाच्या माध्यमातून तुमच्या भागातील स्थानिकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देऊ शकाल.

तेव्हा तुमची व्यवसायाची इच्छा आमच्या साथीने पूर्ण करा. स्वप्नं तुमची, साथ आमची !

Harman Chaha